सुखकर्ता दुःखहर्ता

Back to Work अवधी (Awadhi)
आरती १
मराठी (Marathi)
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
भजन २
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती २
मराठी (Marathi)
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥
भजन ४
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती ३
मराठी (Marathi)
माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ॥ नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥३॥
भजन ६
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती ४
मराठी (Marathi)
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ॥ सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥४॥
भजन ८
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती ५
मराठी (Marathi)
छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ॥ ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥५॥
भजन १०
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती ६
मराठी (Marathi)
ता ता धिमि किट धिमि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ॥ ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥६॥
भजन १२
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव
आरती ७
मराठी (Marathi)
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥७॥
भजन १४
मराठी (Marathi)
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥

Contributors

Veer
सामुदायिक संरक्षण / Community Custodianship

इस अध्याय की अनुवाद स्थिति

Chapter Translation Coverage & Stewardship

यह अध्याय पूर्णतः अनूदित है! आप पाठ की प्रामाणिकता हेतु संशोधन या समीक्षा प्रस्तुत कर सकते हैं।

अनुवाद पूर्णता / Completion: 100% 14/14 छंद अनूदित